फेसबुक नवा लुक प्रसिद्ध होणार

शनिवार, 4 मे 2019 (17:51 IST)
फेसबुक नवा लुक प्रसिद्ध करणार आहे. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने फेसबुक डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये फेसबुकच्या नव्या डिझाईनची घोषणा केली आहे. या नव्या डिझाईनमध्ये मेसेजिंग अ‍ॅप, ऑनलाईन मार्केट प्लेस आणि व्हिडीओ ऑन डिमांड हे एका बाजूला देण्यात आले आहेत. नवे फीचर युजर्ससाठी प्रायव्हेट फीड उपलब्ध करण्यासाठी डिझाईन करण्यात आल्याची माहिती  फेसबुकने दिली आहे.
 
फेसबुकच्या नव्या डिझाईनमध्ये युजर्सच्या खासगी गोष्टीवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. हे डिझाईन प्रायव्हेट आणि एनक्रिप्टेड म्हणजेच प्रायवसीसाठी तयार करण्यात आले आहे. युजर्सचा संवाद हा अधिक सुरक्षीत राहण्यासाठी  असे नवे डिझाईन करण्यात आले आहे. यासोबत  युजर्स कोणता ग्रुप जॉईन करेल तेव्हा त्यांना पर्सनलाइज्ड न्यूज फीड मिळणार आहे. युजर्सना त्यांच्या मोबाईल अ‍ॅपमध्येही काही बदल लवकरच दिसण्यास सुरुवात होईल असेदखील फेसबुकने म्हटले आहे. 
 
फेसबुक मेसेंजरमध्ये अपॉइंटमेंट हे नवे फीचरही लाँच होणार असून याच्या मदतीने हॉटेलचे बुकींग करता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेसबुकचं मेसेंजर अ‍ॅप हे Windows आणि macOS या दोन्ही प्रणालीसाठी लाँच करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रुप मेसेजिंग, व्हिडिओ चॅटिंग, GIF इमेजेस पाठविण्याची सुविधा युजर्सना मिळणार आहे. याशिवाय group viewing हे नवे फीचर येणार आहे. गेमिंग पेजवर युजर्सना अनेक इंटरेस्टिंग गेमचे ऑप्शन देण्यात आले आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती