आदिवासींकडून पाणी फाउंडेशनच्या कामाला विरोध

शुक्रवार, 3 मे 2019 (16:51 IST)
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातल्या मतेवाडी येथे आदिवासींनी पाणी फाउंडेशनच्या कामाला विरोध करत जारदार हल्ला केला आहे. या हल्ल्यात 10 ते 12 गावकरी जखमी झाले असून, पाणी ८ ते ९ गाड्या जाळल्या असून तसेच जेसीबीची तोड फोड करून चालकांना जबर मारहाण केली आहे. जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्या आले आहे. 
 
या घटनेत शुक्रवारी सकाळी 6 वाजताच येथील गावकऱ्यांनी काम सुरू केले. काम सुरू झाले मात्र येथे वास्तव्य करणाऱ्या आदिवासींनी ही जमीन आपण कसत असल्याचे सांगत कामाला विरोध केला. यावेळी आदिवासींनी पाणी फाउंडेशनच्या कामगारांवर गलोल आणि गोफणीने जोरदार हल्ला तरत कामगारांच्या 9 गाड्या जाळल्या. तसेच तेथील जेसीबीची तोड फोड करून दोन जेसीबी चालकांनाही जबर मारहाण केली. आदिवासींच्या हल्ल्यात भाऊराव चव्हाण, जिजाबाई चव्हाण, सुरेखा मते, संतोष मते, सागर कावळे यांच्यासह इतर कामगार जखमी झाले आहेत. तर जेसीबी चालक मोंटू प्रमाद आणि मुन्ना शहा हे दोघे गंभीर जखमी आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती