LG लॉन्च करत आहे एक स्ट्रॅचेबल स्मार्टफोन

शनिवार, 4 मे 2019 (17:23 IST)
2019 मध्ये सर्व स्मार्टफोन कंपन्या फोल्डेबल स्मार्टफोनवर लक्ष केंद्रित करत आहे. Samsung आणि Huawei ने त्यांच्या फोल्डेबल स्मार्टफोन्सला बाजारात सादर केले आहे. त्याच वेळी अमेरिकेच्या विशाल कंपनी अॅपलने अलीकडे फोल्डेबल स्मार्टफोनसाठी पेटंट दाखल केले आहे. या दरम्यान दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी एलजी काही वेगळं करण्याच्या योजनेवर कार्यरत आहे.
 
कंपनी प्रवक्त्याने सांगितले की कंपनी फोल्डेबल स्मार्टफोनवर तर काम नाही करत आहे, पण ती एका यूनिक फोनवर कार्यरत आहे जे सर्वात वेगळं असेल. बातम्यांनुसार कंपनीचा हा स्मार्टफोन स्ट्रॅचेबल असेल. कंपनीने एका पेटंटसाठी दाखल केले आहे, ते दर्शवित आहे की कंपनीचा हा स्मार्टफोन सर्व दिशेने स्ट्रॅचेबल असेल. तरीही ही माहिती उपलब्ध नाही आहे की कंपनी किती काळात ते लॉन्च करेल. कंपनीच्या स्मार्टफोनमध्ये येणाऱ्या स्पेसिफिकेशनचे देखील उघड नाही झाले आहे. 
 
कंपनीने स्पष्टपणे सांगितले आहे की स्मार्टफोनचा डिस्प्ले कसा एकापेक्षा जास्त दिशेने वाढविले किंवा कमी केले जाऊ शकते. फोन स्ट्रॅच केल्यावर त्याचे डिस्प्ले साइज वाढेल. स्ट्रॅचेबल स्मार्टफोनमध्ये समान फायदे मिळतील जसे एखाद्या फोल्डेबल स्मार्टफोनवर मिळतात. 
 
सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सॅमसंग आपला फोल्डेबल स्मार्टफोन गॅलॅक्सी फोल्ड स्मार्टफोन लॉन्च करून चुकले आहे. यानंतर हुवावेने देखील एमडब्लूसी, 2019 मध्ये आपला फोल्डेबल स्मार्टफोन मेट एक्स लॉन्च केला होता. एलजीच्या स्ट्रॅचेबल मोबाईल फोनची ओळख झाल्या बरोबरच मोबाइल बाजारात आणखी एका बातमीची खूप चर्चा होत आहे की सॅमसंग आता दोन अन्य फोल्डेबल फोनवर काम करत आहे, जे फोल्ड मॉडेलपेक्षा वेगळे असतील. फोल्डेबल फोनबद्दल अनेक मोबाइल निर्मात्यांनी घोषणा केल्या आहेत की ते लवकरच त्यांच्या मॉडेल्स बाजारात आणतील. विशेष गोष्ट म्हणजे या सर्व मोबाईल फोन्सला फोल्ड करण्याची पद्धत वेगवेगळी असेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती