SSC Scam Case:माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांची प्रकृती अचानक बिघडली, तुरुंगातून रुग्णालयात आणले

शनिवार, 20 ऑगस्ट 2022 (17:57 IST)
पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांची प्रकृती खालावली आहे. शनिवारी दुपारी त्यांना प्रेसिडेन्सी कारागृहातून एसएसकेएम रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या विविध शारीरिक तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर त्यांना पुन्हा प्रेसिडेन्सी कारागृहात नेण्यात आले.
 
एसएसकेएम रुग्णालयात तपासणीसाठी आणलेल्या पार्थ चॅटर्जीला मीडियाने त्यांची तब्येत कशी आहे, असे विचारले असता, पार्थ चॅटर्जी यांनी त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे उत्तर दिले. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेला पार्थ चॅटर्जी सध्या 31 ऑगस्टपर्यंत तुरुंगात आहे आणि गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पायाला सूज आणि वेदना होत असल्याची तक्रार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती