Free Treatment to Govindas in Government Hospital: देशभरात आज गोकुळाष्टमीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यभरात दहिहंडीसाठी गोविंदाची पथके दही हंडी फोडण्यासाठी सज्ज आहे. दहीहंडी उत्सवात अनेक थर रचून गोविंदा दही हंडी फोडतात. गोविंदा पथकांचा थरार या दिवशी पाहायला मिळतो. त्यामुळे दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे रचताना गोविंदांचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा त्यांना दुखापत झाल्यावर मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्य मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दहीहंडी पथकातील काही गोविंदा उंच थरवरून पडून जखमी होतात. यंदा या सणाच्या उत्साहात गोविंदांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कडून दहीहंडी कार्यक्रमा दरम्यान कोणत्याही गोविंदाला दुखापत झाली तर, शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल. गुरुवारी विधानसभेत केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकिय उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षी पासून दर वर्षासाठी लागू राहील अशी माहिती देण्यात आली आहे.