गोविंदांना क्रीडा कोट्यातून आरक्षणाची घोषणा, निर्णयाविरुद्ध MPSC परिक्षार्थी आक्रमक

शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (09:31 IST)
दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (18 ऑगस्ट) विधानसभेत केली आहे. तसंच दहीहंडीत सहभाग नोंदवणाऱ्या गोविंदांना क्रीडा कोट्याच्या 5 टक्के आरक्षणाचा लाभही मिळेल, अशी घोषणा शिंदे यांनी केली. पण याच घोषणेवरून वादंग सुरू होताना दिसत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्णयाविरुद्ध परीक्षार्थी संघटना आक्रमक होत असून त्यांनी या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला आहे.
 
MPSC समन्वय समिती महाराष्ट्र राज्य या परीक्षार्थ्यांच्या संघटनेने यासंदर्भात एक ट्विट करून निर्णयाचा विरोध केला.
 
या ट्विटमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, रविकांत वर्पे, आमदार रोहित पवार, काँग्रेस नेते सत्यजित तांबे, भाजप नेते केशव उपाध्ये, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जितेंद्र आव्हाड, सीएमओ आणि रामराजे शिंदे यांना टॅग करण्यात आले आहे.
 
समाज अधोगतीकडे नेण्याचे मूर्तिमंत उदाहरण. दहीहंडी मधील गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देऊन सरकारची आमच्याकडून काय अपेक्षा आहे? आम्हीसुद्धा लायब्ररी सोडून भगवे झेंडे घेत दहीहंड्या फोडत फिरायचे का, असा सवाल परीक्षार्थींनी राज्य सरकारला विचारला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती