नीलम गोऱ्हे यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना चांगलंच सुनावलं

गुरूवार, 18 ऑगस्ट 2022 (16:15 IST)
परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना चांगलंच सुनावलं आहे. तुम्ही तुमच्या घरी मंत्री असाल, हे सभागृह आहे, तुम्ही ताबडतोब खाली बसा, अशा शब्दांत नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना खडसावलं आहे. शिक्षकांच्या निधीबाबत चर्चा सुरू असताना गुलाबराव पाटील सभागृहात खाली बसून बोलत होते, त्यानंतर ही खडाजंगी पाहायला मिळाली आहे.
 
उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटलांना आपली बाजू मांडण्यासाठी वेळ दिला, पण त्यांनी आपली बाजू मांडण्याऐवजी अनिल परब यांच्यावर आरोप करायला सुरुवात केली. प्रश्नांचं उत्तर देण्याऐवजी ते मागच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करू लागले, यामुळे नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना खाली बसण्याची विनंती केली. मात्र, गुलाबराव पाटील आक्रमक होऊन बोलतच राहिले, यामुळे नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटलांना सुनावलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती