Earthquakes News : गुरुवारी सकाळी म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहे. त्यांची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल होती. तसेच कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. याच्या काही तास आधी भारत आणि नेपाळमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळमध्ये ४.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला, तर भारतातील गुजरात राज्यातील कच्छ भागात ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. या सर्व ठिकाणी अजून कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, पण येथे चांगली गोष्ट म्हणजे कोणतेही नुकसान झाले नाही. बुधवारी संध्याकाळी कच्छ जिल्ह्यात ३.४ तीव्रतेचा भूकंप झाल्याचे भूकंपशास्त्रीय संशोधन संस्थेने (आयएसआर) सांगितले. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही, असे जिल्हा आपत्ती प्रतिसाद अधिकाऱ्यांनी सांगितले.