मिळालेल्या माहितीनुसार गुजरातमधील सुरतमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका डायमंड कंपनीच्या वॉटर कूलरमध्ये कोणीतरी विषारी पदार्थ मिसळला ज्यामुळे कंपनीतील ११८ कर्मचारी आजारी पडले. सर्व आजारी कर्मचाऱ्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारानंतर सर्व कर्मचाऱ्यांची प्रकृती सामान्य आहे. सध्या कोणाचीही प्रकृती गंभीर नाही पण त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
पोलिसांनी सांगितले की, कोणीतरी कंपनीतील कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले होते आणि पिण्याच्या पाण्यात विषारी पदार्थ मिसळले होते, ज्यामुळे कर्मचारी आजारी पडले. डीसीपी म्हणाले की, कपोदरा परिसरातील मिलेनियम कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या अनुभव जेम्सच्या कर्मचाऱ्यांना कंपनी मालकाने खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय तपासणीसाठी दोन वेगवेगळ्या रुग्णालयात नेले.
ती कीटकनाशकांनी भरलेली फाटलेली प्लास्टिकची पिशवी होती, त्यामुळे काही प्रमाणात विषारी पदार्थ पाण्यात मिसळले असावेत, जे कर्मचाऱ्यांनी प्यायले, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. फॉरेन्सिक टीम तपास करत आहे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. पोलिसांनी ५ पथके तयार केली आहे.