दिल्लीत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे सांगितले. गडकरी म्हणाले, "आम्ही एक नवीन धोरण आणत आहोत, ज्यामुळे सामान्य माणसाला दिलासा मिळेल. आम्ही टोल वसुलीची प्रक्रिया बदलत आहोत. मी आत्ताच यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही, परंतु मला विश्वास आहे की पुढील 8-10 दिवसांत ते जाहीर केले जाईल."
या नवीन टोल प्रणाली लागू झाल्यानंतर लोकांना टोल करात सवलत मिळू शकते. या कार्यक्रमात गडकरी यांनी आश्वासन दिले की यामुळे प्रवाशांवरील आर्थिक भार कमी होईल, जो बऱ्याच काळापासून एक मोठी चिंता आहे. यापूर्वीही त्यांनी गेल्या महिन्यात संसदेत या टोल धोरणाचा उल्लेख केला होता. आणि सरकारला ही प्रणाली अधिक वापरकर्ता-अनुकूल बनवायची आहे असे सांगण्यात आले