प्रेयसीची हत्या करून मृतदेह फ्रीजमध्ये, श्रद्धासारखी पुन्हा एक हत्या

Webdunia
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2023 (17:36 IST)
देशाची राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा श्रद्धा हत्याकांड सारखे प्रकरण समोर आले आहे. दिल्लीतील नजफगढ भागात एका मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह ढाब्याच्या रेफ्रिजरेटरमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून ढाब्यातून मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येतील आरोपीचे नाव साहिल गेहलोत असून त्याचा शोध सुरू आहे. ही घटना नजफगडमधील मित्राव गावात घडली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार मयत आरोपीची मैत्रीण होती. काही दिवसांपूर्वी आरोपी गेहलोतचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न ठरले होते.
 
 
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी सकाळी मित्राव गावाच्या हद्दीत एका मुलीची हत्या करून तिचा मृतदेह ढाब्यात लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. आरोपी साहिल गेहलोत हा मित्राव गावचा रहिवासी असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
 
आफताबने श्रद्धाचा मृतदेहही फ्रीजमध्ये लपवून ठेवला होता
श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब यानेही श्रद्धाचा मृतदेह फ्रीजमध्येच लपवून ठेवला होता. श्रद्धा खून प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना समजले की आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे अनेक तुकडे केले होते. श्रद्धाचा मृतदेह कापण्यापूर्वी आफताबने नवीन फ्रीज घेतला होता. आफताबने काही दिवस श्रद्धाचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला होता. त्यानंतर हळूहळू आफताबने मृतदेहाचे तुकडे मेहरौली आणि गुरुग्रामच्या जंगलात टाकले.

संबंधित माहिती

पुढील लेख