भेटण्यास न आल्याने एका तरुणाने तरुणीचा आक्षेपार्ह केला व्हिडीओ एका व्हाॅट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

मंगळवार, 14 फेब्रुवारी 2023 (08:07 IST)
भेटण्यास न आल्याने एका तरुणाने  तरुणीचा आक्षेपार्ह केला  व्हिडीओ एका व्हाॅट्सअॅप ग्रुपवर व्हायरल
फोन करूनही भेटण्यास न आल्याने एका तरुणाने संबंधित पीडित तरुणीचा आक्षेपार्ह व्हिडीओ एका व्हाॅट्सअॅप ग्रुपवर व्हायरल केला. ही धक्कादायक घटना साताऱ्यात घडली असून, याप्रकरणी जळगावच्या तरुणावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
अनिलसिंह अजितसिंह चिताैडिया (वय २४, जि. जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित तरुणी २१ वर्षांची आहे. अनिलसिंह याने काही दिवसांपूर्वी पीडित तरुणीचा आक्षेपार्ह व्हिडीओ जबरदस्तीने तयार केला होता. तो तिला वारंवार भेटण्यास बोलावत होता. मात्र, पीडित तरुणीने त्याला भेटण्यास नकार दिल्याने व्हिडीओ केलेले चित्रिकरण त्याने एका व्हाॅट्सअॅप ग्रुपवर व्हायरल केले. या ग्रुपवर संबंधित तरुणीच्या काही ओळखीचे लोक होते. त्यांनी हा प्रकार पीडित तरुणीला सांगिल्यानंतर तिने सातारा तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. सहायक फाैजदार बागवान हे अधिक तपास करीत आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती