मिळालेल्या माहितीनुसार, अजमेर हायवेवर चांदपोलहून बागरूकडे जाणाऱ्या लो फ्लोअर बसला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघातात बसमध्ये बसलेले सुमारे 10 प्रवासी जखमी झाले. प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजमेर रोडवरील हायवे किंग हॉटेल बागरूजवळ हा अपघात झाला.
तसेच बागरू पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संद्याकाळी साडेसात वाजता अजमेर रोडवरील हॉटेल हायवे किंग बागरूजवळ एका बसला अपघात झाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले.