मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी अनेक वाहने अशा ठिकाणी होती की लोकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. टँकरच्या पाठीमागे धावणारी स्लीपर बस आणि महामार्गाच्या कडेला असलेली पाईप फॅक्टरीही जळाली. स्फोट आणि आगीमुळे महामार्ग बंद करण्यात आला आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आणि रुग्णवाहिकांसह मोठ्या संख्येने पोलीस घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाचे पथक आग विझवण्यात व्यस्त आहे. पोलीस पथकाच्या मदतीने सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल असलेल्या अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.#WATCH | Jaipur, Rajasthan | 4 dead and several injured in a major accident and fire incident in the Bhankrota area.
— ANI (@ANI) December 20, 2024
A fire broke out due to the collision of many vehicles one after the other. Efforts are being made to douse the fire. pic.twitter.com/3WHwok5u8W
अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री भजनलाल शर्मा जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयात पोहोचले आहे. त्यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला.#WATCH भांकरोटा आग दुर्घटना | जयपुर: राजस्थान के मुख्यमंत्री भजन लाला शर्मा ने कहा, "मैं अस्पताल जाकर भी आया हूं जहां मैंने अस्पताल के सभी अधिकारियों को तुरंत इलाज के निर्देश दिए हैं... सरकार इस घटना के संबंध में जो बल पड़ेगा वो करेगी, इलाज में भी हम सहयोग करेंगे... जो इस घटना… pic.twitter.com/xrusiRmy0Z
— ANI_HindiNews (@AHindinews) December 20, 2024