जयपूर-अजमेर महामार्गावर केमिकलने भरलेल्या टँकरचा स्फोट, 5 जणांचा मृत्यू

शुक्रवार, 20 डिसेंबर 2024 (09:07 IST)
Jaipur News: जयपूर-अजमेर महामार्गावर शुक्रवारी सकाळी रसायनांनी भरलेल्या टँकरचा अपघात झाला आणि त्याचा स्फोट झाला आहे. त्यामुळे भीषण आग लागली. या आगीत अनेक वाहने जळून खाक झाली. पोलिसांनी ही माहिती दिली. या आगीत सुमारे 30 जण भाजले. जिवंत जळल्यामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाच्या गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. प्राथमिक माहितीनुसार, ट्रक केमिकलने भरलेला होता, जो इतर ट्रकवर आदळला. यानंतर एकामागून एक वाहने आपटत राहिली. त्यामुळे रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीत सुमारे 40 वाहने जळून खाक झाली. सर्व जळालेल्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री रुग्णालयात पोहोचले. त्यांनी जखमींबाबत डॉक्टरांशी चर्चा करून उपचाराबाबत आवश्यक मार्गदर्शन केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती