रुग्णालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की मुलाचा मृत्यू उंदीर चावल्यामुळे झाला नसून सेप्टिसिमिया शॉक आणि जास्त संसर्गामुळे झाला आहे. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संदीप जासुजा म्हणाले, "मुलाला ताप आणि न्यूमोनिया देखील झाला होता. उच्च संसर्ग, सेप्टिसिमिया शॉकमुळे शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला.
एका स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, प्रवेश घेतल्यानंतर काही वेळातच मूल रडू लागले. त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्याकडील घोंगडी काढली असता उंदराच्या चाव्यामुळे त्याच्या एका पायाच्या बोटाला रक्तस्त्राव झाल्याचे दिसले. कुटुंबीयांनी तेथे उपस्थित नर्सिंग स्टाफला माहिती दिली, त्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पायाला पट्टी बांधली.