झारखंडची राजधानी रांची येथील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या रिम्समधील एका इंटर्न डॉक्टरचा धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी डॉक्टर रांचीपासून सुमारे ४० किमी अंतरावर असलेल्या खुंटी जिल्ह्यातील तोरपा येथील पेरवाघाघ धबधब्यावर पिकनिकसाठी गेले होते.
मिळालेल्या माहितीनुसार पाण्यात आंघोळ करत असताना, अचानक चार डॉक्टर खोल पाण्यात गेले आणि बुडू लागले. तिथे उपस्थित असलेल्या इतर डॉक्टरांनी आरडाओरड केली, त्यानंतर स्थानिक गोताखोर घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तिन्ही डॉक्टरांना सुखरूप बाहेर काढले. पण एकाला पाण्यातून बाहेर काढण्यात आले तेव्हा त्यांची प्रकृती खूपच गंभीर होती. त्याला ताबडतोब तोरपा येथील रुग्णालयात नेण्यात आले, जिथे प्राथमिक उपचारानंतर त्याला रांची येथील रिम्स रुग्णालयात रेफर करण्यात आले. रिम्समध्ये पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर रिम्स रुग्णालयात शोकाचे वातावरण आहे.