मनसे कार्यकर्त्यांकडून महिलेला मारहाण,सोशल मीडियावर व्हिडीओ प्रचंड व्हायरल

Webdunia
गुरूवार, 1 सप्टेंबर 2022 (21:29 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या मुंबादेवी परिसरात घडली. बॅनर लावण्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी महिलेला मारहाण केली आहे. प्रकाश देवी असे पीडित महिलेचे नाव असून, त्यांच्या मेडीकलसमोर मनसेचे कार्यकर्ते खांब उभे करून बॅनर लावत होते. तेव्हा महिलेने या बॅनर लावण्याला विरोध केला असता, तिला मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
 

संबंधित माहिती

पुढील लेख