नवी मुंबईत भीषण अपघात, इमारतीचा सहाव्या मजल्याचा स्लॅब कोसळला; सात जण रुग्णालयात दाखल

Webdunia
शनिवार, 11 जून 2022 (17:24 IST)
महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील नवी मुंबई परिसरात शनिवारी दुपारी इमारतीचा काही भाग कोसळल्याने खळबळ उडाली होती.घटनेची माहिती मिळताच पोलिस-प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचाव आणि मदतकार्य सुरू केले.या घटनेत जखमी झालेल्या सात जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
या दुर्घटनेत अजूनही एक व्यक्ती इमारतीत अडकल्याचे सांगण्यात येत आहे, त्याला बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरू आहे.घटनेनंतर अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

<

Maharashtra | A part of building collapses in Navi Mumbai; rescue operation underway pic.twitter.com/zC0S05B8Oz

— ANI (@ANI) June 11, 2022 >या घटनेबाबत नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले की, नवी मुंबईतील एका इमारतीच्या सहाव्या मजल्याचा स्लॅब तळमजल्यावर पडल्याने सात जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.बचावकार्य सुरू आहे.