छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण, माविआचे राज्य सरकार विरोधात जोडेमारो आंदोलन, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
रविवार, 1 सप्टेंबर 2024 (13:14 IST)
26 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गच्या राजकोट किल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी सध्या राज्यात राजकीय वातावरण तापले आहे.राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीने हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत जोडेमारो आंदोलन केले आहे. या आंदोलनात आंदोलकांनी घोषणाबाजी केली.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य राखीव पोलीस, मुंबई पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल, दंगल विरोधक पथक, दहशतवाद विरोधी पथक, व्हेन कंट्रोल पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या मोर्च्यात 5 हजार पोलिसांना तैनात केले आहे. तसेच हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत मोठा पोलीस बंदोबस्त केला आहे.
हा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे नेते उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेश प्रमुख नाना पाटोळे, पक्षाच्या मुंबई विभागाचे प्रमुख वर्षा गायकवाड, हे उपस्थित आहे. हुत्मात्मा झालेल्यांच्या समरणार्थ बांधण्यात आलेल्या .हुतात्मा चौकात त्यानी पुष्पहार अर्पण करून निषेध मोर्चाला सुरुवात केली.
सकाळी 11 नंतर निघालेल्या मोर्चात कोल्हापूरचे काँग्रेस खासदार शाहू छत्रपती, राष्ट्रवादीच्या (एसपी) नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार अनिल देशमुख यांचा समावेश होता. त्याचवेळी या प्रकरणावर होत असलेल्या राजकारणाबाबत भाजपकडून मोठा निषेध करण्यात येत आहे.
शिवसेनेचे (यूबीटी) खासदार अरविंद सावंत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी देवासारखे आहेत. त्यांची मूर्ती पडली आणि त्यासोबतच आमची भक्ती, आदर आणि स्वाभिमानही पडला. एवढा अपमान होऊनही त्याला पाठिंबा देणारे राजकीय पक्षांचे नेते त्याचा निषेध करणार. केंद्र सरकारचे धोरण महाराष्ट्राचा अवमान करण्याचे आहे. हे आंदोलन महाराष्ट्राच्या सन्मानासाठी आहे,ज्याचा अपमान झाला आहे.
आंदोलनाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज होत असलेले आंदोलन पूर्णपणे राजकीय आंदोलन आहे. त्यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर केला नाही. तुम्ही मला लाल किल्ल्यावरून पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांचे एकही भाषण दाखवा, ज्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला आहे. नेहरूंनी तर त्यांच्या 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया'मध्ये छत्रपती महाराजांचा अपमान केला होता. यासाठी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी माफी मागणार का?