महाराष्ट्रासह या 5 राज्यात अतिवृष्टीचा इशारा, विदर्भ, तेलंगणामध्ये रेड अलर्ट जारी

रविवार, 1 सप्टेंबर 2024 (12:50 IST)
हवामान विभागानं महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि तेलंगणा य राज्यात आज 1 सप्टेंबर रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर विदर्भ आणि तेलंगणा मध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

बंगालच्या उपसागारात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून मध्य भारताच्या दिशेने कमी दाबाचा पट्टा सरकत आहे. तर गुजरात किनारपट्टीपासून केरळ पट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. या स्थितीमुळे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. मराठवाडा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटकात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

विदर्भ मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.विदर्भात अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.  
मुंबई आणि उपनगरात पावसाच्या सरी कोसळणार असून कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नाशिक,धुळे, नंदुरबार जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती