गणेश मंदिर श्री क्षेत्र पद्मालय

रविवार, 1 सप्टेंबर 2024 (07:00 IST)
महाराष्ट्रातील जळगांव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यापासून अवघ्या 10 किमी अंतरावर असलेल्या पद्मालय गावात हेमाडपंथी स्थापत्य शैलीत बांधलेले पावित्र्य पद्मालय गणेश मंदिर हे अतिशय सुंदर आणि स्वयंभू आहे. तसेच येथील पंचक्रोशीत जागृत स्थान म्हणून श्री क्षेत्र पद्मालय हे ओळखले जाते. पद्मालय येथील हे प्राचीन मंदिर श्री गणेश यांना समर्पित आहे. 
 
इतिहास-
जळगांव जिल्ह्यातील श्री पद्मालय हे भारतातील अडीच श्री गणपती पीठांपैकी एक आहे. या मंदिराच्या गर्भगृहामध्ये दोन स्वयंभू गणेश मूर्ती आहे. ज्यातील एका गणपतीचे नाव आहे "आमोद" आणि दुसऱ्या गणपतीचे नाव आहे "प्रमोद". पण या दोन गणेशजींची सोंड विरुद्ध दिशेला आहे. एका गणपतीची सोंड डाव्या बाजूला आहे तर दुसऱ्या गणपतीची सोंड उजव्या बाजूला आहे. मंदिराच्या समोर कमळाच्या फुलांनी भरलेला एक तलाव आहे. म्हणून या जागेला ''पद्मालय'' असे नाव पडले. तसेच मुख्य मंदिराच्या चारही बाजूंनी छोटे छोटे मंदिरे आहे. मंदिराच्या समोर श्री गोविंद महाराज यांचा पादुका स्थापित आहे. पदमालय मंदिराचे पुनःनिर्माण 1912 मध्ये सदगुरू गोविंद महाराज यांनी केले होते. पादुकांच्या जवळच 440 किलोची एक विशाल, भव्य घंटा आहे. तसेच या गणपती मंदिरापासून काही अंतरावर भीमकुंड आहे. म्हणजे भीमाच्या भल्यामोठ्या पायाचा ठसा इथे उमटलेला आहे. व या पायामध्ये सदैव पाणी भरलेले असते म्हणून याला भीमकुंड असे नाव देण्यात आले. महाभारतात पांडवांना वनवास झाला असतांना पांडव फिरत फिरत एकचक्रीनगरात आले होते. एकचक्रीनगर म्हणजे आताचे जळगांव जिल्ह्यातील एरंडोल होय.  
 
आख्यायिका-
पौराणिक आख्यायिका अनुसार महाभारतातील कुंती पुत्र भीम ने राक्षस बकासुर याच्याशी युद्ध केले होते. व या युद्धामध्ये हा राक्षस ठार झाला होता, या युद्धानंतर भीमाला तहान लागली. याकरिता त्यांनी आपला पाय जमिनीतावर आपटून एक कुंड तयार केले. या कुंडाला भीमकुंड असते संबोधले जाते. तसेच हे भीमकुंड मंदिरापासून काही अंतरावर आहे.  
 
सण उत्सव-
पद्मालय येथील गणपती मंदिरात सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात. विशेष करून अंगारिका चतुर्थी, गणेश चतुर्थीला इथे भक्तांची मोठी गर्दी पाहावयास मिळते. तसेच दरवर्षी येणार गणेशउत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. मंदिर फुलांनी, माळांनी, पताक्यांनी सजवण्यात येते. दहा दिवस इथे हजारोच्या संख्येने भक्त दर्शन घेण्यास येतात. 
 
गणेश मंदिर पद्मालय जावे कसे?
रस्ता मार्ग- नॅशनल हायवे सहा हा मुंबई नागपूर जोडलेला आहे याच हायवेवर असणारे एरंडोल वरून पद्मालय येथे जाण्यासाठी खासगी वाहन किंवा रिक्षा करून मंदिरापर्यंत पोहचता येते. तसेच रेल्वे मार्गाने जायचे असल्यास जळगांव जंक्शन स्टेशनवर उतरल्यानंतर बस ने एरंडोल पर्यंत जाऊन तिथून रिक्षाने मंदिरापर्यंत सहज पोहचता येते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती