पावसाळ्यात नक्की भेट द्या महाराष्ट्रातील या पाच अविस्मरणिय स्थळी

शनिवार, 10 ऑगस्ट 2024 (07:00 IST)
1. अंजनेरी पर्वत
अंजनेरी पर्वत हा महाराष्ट्रातील नाशिक शहरातील प्रमुख आकर्षक स्थळांपैकी एक स्थळ आहे. हा पर्वत नाशिकपासून 20 किमी दूर स्थित आहे. तसेच या पर्वतावर एक किल्ला आहे ज्याचे नाव अंजनेरी आहे.
हा किल्ला त्र्यंबकेश्वरच्या आत येतो. असे मानले जाते की या अंजेनेरी पर्वतावर हनुमंताचा जन्म झालेला आहे. हे क्षेत्र समुद्र तळापासून 4,264 फूट उंचावर आहे. अंजनेरी पर्वत ट्रेकिंगसाठी एक सुंदर ठिकाण आहे. येथील चारही दिशांना असलेले नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना मोहात टाकते. या पर्वतावर घनदाट झाडे, गुफा, सरोवर व धबधबे या स्थळाची शोभा वाढवतात. येथील मनमोहक दृश्य ट्रेकिंगच्या अनुभवाला रोमांचकारी बनवते. 
 
जावे कसे?
विमान मार्ग : तुम्ही नाशिक पर्यंत विमानसेवेने येऊ शकतात. यायंत्र इथून पब्लिक ट्रांसपोर्ट किंवा कॅप करून अंजनेरी पर्यंत पोहचू शकतात. विमानतळापासून अंजनेरी 50 किमी आहे. 
रेल्वे मार्ग : रेल्वे मार्गाने जायचे झाल्यास नाशिक रेल्वे स्टेशन उत्तम पर्याय आहे. नाशिक रेल्वे स्टेशनवरून तुम्ही पब्लिक ट्रांसपोर्ट व्दारा अंजनेरी पर्यंत पोहचू शकतात. 
रस्ता मार्ग : अंजनेरी पर्वतापासून हायवे जातो. तसेच अनेक वाहन द्वारा येथे पोहचता येते. 
 
2. ब्रह्मगिरी पर्वत-
महाराष्ट्रातील नाशिकमध्ये असलेला ब्राह्मगिरी पर्वत हा नैसर्गिक साधनांनी परिपूर्ण आहे. पश्चिम घाटात स्थित हा पर्वत खूप उंच आहे. या पर्वताचे सौंदर्य पावसाळ्यात विलक्षण असते. तसेच गोदावरी जी महाराष्ट्रात दक्षिण वाहिनी म्हणून ओळखली जाते तिचा उगम ब्राह्मगिरी पर्वतातून होतो. ब्राह्मगिरीचा चढउतार पर्यटक आणि ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी थोडा आव्हानास्पद आहे. झाडांमध्ये अनेक ट्रेकिंग ट्रेल्स आहे. या पर्वतमाला नैसर्गिक सौंदर्यांनी नटलेल्या आहे. 
 
जावे कसे?
ब्राह्मगिरी पर्वत पर्यंत पोहचण्यासाठी नाशिकवरून अनेक खाजगी किंवा परिवहन बसने जात येते.
 
3. पन्हाळा किल्ला-
पन्हाळा किल्ला महाराष्ट्रातील कोल्हापूर या मुख्य शहरापासून 20 किमी दूर उत्तर-पश्चिम मध्ये स्थित आहे. हा किल्ला देशातील विशाल स्थानांपैकी एक आहे. तसेच दक्खन क्षेत्रामध्ये सर्वात मोठा किल्ला आहे. याला एक रणनीतिक स्थानावर बनवण्यात आले होत. ज्यांना इतिहास आवडतो किंवा जाणून घेण्याची इच्छा असते अश्या लोकांना हा गड आकर्षित करतो.तसेच ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे त्यांना देखील हा गड आकर्षित करतो. आल्हादायक वातावरणामुळे हा किल्ला पर्यटकांना नेहमी आवडतो.  
 
जावे कसे?
या किल्ल्याला भेट देण्यासाठी कोल्हापूर वरून तुम्हाला अनेक वाहनसेवा उपलब्ध मिळेल.
 
4. तोरणा किल्ला 
महाराष्ट्रात पुणे मध्ये असलेला 'तोरणा किल्ला' तुम्हाला ठाऊक असले. समुद्रापासून कमीतकमी एक हजार मीटर पेक्षा अधिक उंचावर या किल्ल्यावर अनेक वर्षांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केले होते. ऐतिहासिक स्मारक रूपात प्रसिद्ध असलेला हा किल्ला पर्यटकांना पावसाळ्यात विशेष आकर्षित करतो.  तसेच जर तुम्ही पावसाळ्यात फिरायला जायचा विचार करीत असाल तर या किल्ल्याला नक्कीच भेट द्या. हे ठिकाण पर्यटकांसाठी खास आहे कारण किल्ल्याला भेट देण्याबरोबरच ट्रेकिंग, हायकिंग आणि कॅम्पिंगचाही आनंद घेऊ शकतात. टेकडीच्या सर्वात उंच ठिकाणी उपस्थित असल्याने मुख्य बिंदूवर जाण्यासाठी पायी जावे लागते. तोरणा किल्ला हे कुटुंब किंवा मित्रांसह भेट देण्याचे सर्वोत्तम ठिकाण आहे. साधारणपणे पावसाळ्यात येथे पर्यटकांची गर्दी असते. विशेषत: शनिवार व रविवारच्या दिवसात, काम करणारे लोक काही निवांत वेळ घालवण्यासाठी येथे येतात.

जावे कसे?
पुण्यामधील स्वारगेट बस्थानकावरून बसने किल्याच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे गावात उतरावे लागते.  
 
5. प्रतापगड दुर्ग- 
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ला समुद्रापासून 3500 मीटर उंचावर स्थित आहे.  महाबळेश्वर हिल स्टेशपासून 24 किमी दूर असलेला हा दुर्ग लोकप्रिय टूरिस्ट डेस्टिनेशन बनलेला आहे. इथे तुम्ही ट्रेकिंगसाठी येऊ शकतात. छत्रपती शिवाजी महाराजांची वीरता आणि पराक्रमाची साक्ष देणारा हा किल्ला अजून देखील भक्कमपणे उभा आहे. पावसाळ्यात या किल्ल्याचे सौंदर्य असे खुलते जणू हिरवा शालू परिधान करते सृष्टी. या किल्ल्याला पावसाळ्यात नक्कीच भेट द्या. 
 
जावे कसे?
विमान मार्ग- या किल्यापासून जवळचे विमानतळ हे पुणे आहे. 
रेल्वे मार्ग- वीर दसगांव येथील सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. 
रस्ता मार्ग- महाबळेश्वर पासून 24 किमी वर असलेला प्रतापगड, जिथे तुम्ही दिवस जाऊ शकतात. तसेच खाजगी वाहन असल्यास या दुर्ग पर्यंत पोहचता येते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती