मिळालेल्या माहितीनुसार मनोरंजन विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक तेजी कहलोन गंभीर जखमी झाले आहे. कॅनडामध्ये त्यांच्यावर हल्ला झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गायकाच्या पोटात गोळी लागली. तसेच या गोळीबारामागे रोहित गोदरा गँगचा हात असल्याचे वृत्त आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सोशल मीडिया पोस्टमध्ये या टोळीनेच हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. पोलिस आता संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे, तर ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.