माझ्या पहिल्या दिवाळी रिलीज थामा सोबत करिअरमधील सर्वात मोठी ओपनिंग देणं हा अविश्वसनीय अनुभव आहे!’ : आयुष्मान खुराना
बुधवार, 22 ऑक्टोबर 2025 (14:25 IST)
बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना याने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की तो भारतीय चित्रपटसृष्टीतील मास्टर ऑफ युनिकनेस आहे. त्याच्या पहिल्याच दिवाळी रिलीज — दिनेश विजन निर्मित थम्मा (मॅड्डॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्स / MHCU चा भाग) — ने भारतात ₹25.11 कोटी नेटची विक्रमी ओपनिंग घेतली असून ही त्याच्या करिअरमधील सर्वात मोठी सुरुवात ठरली आहे.
या भव्य ओपनिंगसह, आयुष्मानने स्त्री, भेड़िया आणि मुंझ्यासारख्या MHCU मधील ऑरिजिन स्टोरीजपेक्षा अधिक मोठी ओपनिंग मिळवली आहे आणि थामा फ्रँचायझी आता अधिक बळकट होत आहे.
आयुष्मान म्हणतो,“मी एक एंटरटेनर आहे आणि लोकांना थम्मा आणि माझं काम एवढ्या प्रेमाने एन्जॉय करताना पाहणं म्हणजे माझ्यासाठी प्रचंड आनंदाची गोष्ट आहे. जेव्हा माझे निर्माता दिनेश विजन यांनी मला सांगितलं की थम्मा दिवाळीत रिलीज होणार आहे, तेव्हा मी अत्यंत उत्साहित झालो. माझ्या करिअरमध्ये असं एक क्षण यावा अशी नेहमीच इच्छा होती.”
तो पुढे सांगतो,“मी नेहमीच वेगळ्या आणि हटके विषयांवर आधारित सिनेमे केले आहेत. मला अशा एका संधीची वाट पाहत होतो जिथे माझ्या शैलीचा सिनेमा दिवाळी सारख्या मोठ्या सणात रिलीज होईल — ज्या काळात नेहमी सुपरस्टार्स त्यांच्या मोठ्या चित्रपटांसह थिएटर्समध्ये झळकतात. थम्मा हा माझ्या करिअरचा टेंटपोल चित्रपट आहे आणि तो दिवाळीत रिलीज होणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. पूर्वी मी कुटुंबासोबत थिएटर्समध्ये सुपरस्टार्स चित्रपट पाहायला जायचो, आज मी माझ्या कुटुंबासोबत माझाच चित्रपट पाहायला गेलो — हे अविश्वसनीय वाटतंय!”
पहिल्यांदाच, हटके विषयांसाठी प्रसिद्ध असलेल्या स्टारने दिवाळीच्या काळात बॉक्स ऑफिसवरील सर्व अंदाज मोडून काढले आहेत, हे सिद्ध करत की उत्तम कंटेंट आणि आयुष्मान यांची जोडी म्हणजे यशाचं अचूक सूत्र आहे.
आयुष्मान म्हणतो,“ही माझ्या हिंदी सिनेमातील प्रवासाची एक मोठी पुष्टी आहे. दिनेश विजन यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला भारतीय बेताळसारख्या अनोख्या पात्राची भूमिका दिली, यासाठी मी त्यांचा आभारी आहे. प्रेक्षक थिएटर्समध्ये माझ्या या पात्राचा मनापासून आनंद घेत आहेत, हे पाहून जे समाधान मिळतंय ते शब्दांत सांगता येणार नाही.”
आता आयुष्मान आपल्या करिअरमधील सर्वात मोठ्या ओपनिंग विकेंडकडे वाटचाल करत आहे आणि मॅड्डॉक फिल्म्सला एक असा पात्र देत आहे जो MHCUच्या प्रवासाला आणखी पुढे नेईल.
अनोख्या कॉमेडी सिनेमांच्या बाबतीत आयुष्मानचा स्ट्राईक रेट सर्वोत्तम आहे — त्याचे सुमारे 90 टक्के हटके चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट किंवा ब्लॉकबस्टर ठरले आहेत.
आयुष्मान म्हणतो,“पहिल्या दिवसाचं प्रेम आणि प्रतिसाद यांनी तो समज मोडून काढला की प्रेक्षक फक्त सिक्वेल्स, रिमेक्स किंवा मोठ्या सुपरस्टार्सचे सिनेमेच दिवाळीत पाहू इच्छितात. थामा च्या यशाने पुन्हा दाखवून दिलं की लोकांना आजही उत्तम कंटेंट पाहायचा आहे.”
तो पुढे म्हणतो,“प्रेक्षक आपल्या कुटुंबासह, मुलांसह माझा सिनेमा पाहण्यासाठी थिएटर्समध्ये येत आहेत. प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं की त्याचा चित्रपट दिवाळीसारख्या मोठ्या सणात रिलीज व्हावा आणि इतक्या प्रेमाने स्वीकारला जावा. थामा सोबत मला हे अनुभवायला मिळतंय, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे.”