Photo: Tejavini Facebook
तुझेच मी गीत गात आहे फेम अभिनेत्री निर्मिती तेजस्विनी लोणारी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तेजस्विनीचा साखरपुडा रविवारी 26 ऑक्टोबर रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. तिने शिवसेना युवानेते समाधान सरवणकरशी लग्नगाठ जोडण्याचा निर्णय घेतला असून लवकरच ते वैवाहिक बंधनात अडकणार आहे. समाधान सरवणकर हे शिवसेना नेते सदा सरवणकर यांचे पुत्र आहे.
या वेळी तेजस्विनीने पारंपरिक वेशभूषा केली असून लाल रंगाची डिझायनर साडी परिधान केली होती. हातात हिरवा चुडा, गळ्यात मोठा हार घातिला होता. या लूकने तिचे सौंदर्य अजूनच खुलत होते. साखरपुड्याला अनेक गणमान्य लोकांनी हजेरी लावली. तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.