मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी अंबरनाथचे बांधकाम व्यावसायिक संजय शेळके यांच्या मुलाची स्विफ्ट कार एका इर्टिगा कारने अडवून त्यांना बळजबरीने दुसऱ्या कारमध्ये बसवले. अपहरणकर्त्यांनी तत्काळ संजय शेळके यांच्याकडे 40 कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि रक्कम न दिल्यास मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच या घटनेची माहिती संजय शेळके यांनी तत्काळ अंबरनाथ पोलिसांना दिली. व प्रकरणाचे गांभीर्य समजून पोलिसांनी 15 अधिकारी आणि 80 पोलिसांची 8 टीम तयार केली. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 45सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करून तांत्रिक निरीक्षण सुरू केले. परंतु, आरोपी वारंवार त्यांची ठिकाणे बदलत राहिल्याने पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागला.
तसेच अपहरणकर्त्यांनी सुरुवातीला 40 कोटी रुपयांची मागणी केली. फिल्मी स्टाईलमध्ये साध्या गणवेशातील पोलिसांनी दुचाकीवरून ओला कारचा पाठलाग केला, पोलिसांच्या आपला पाठलाग करत असल्याचा अपहरणकर्त्यांना संशय आला. तर त्यांनी अपहृत तरुणाला भिवंडी येथील पिसे धरणाजवळ सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी क्षणांचा विलंब न करीत अपहरण झालेल्या तरुणाची सुखरूप सुटका केली आणि मोबाईल लोकेशनच्या मदतीने एका आरोपीला पकडले. त्याच्या माहितीवरून अन्य 9 आरोपींनाही अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी पिस्तूल, इतर हत्यारे आणि वाहनेही जप्त केली आहे.