या प्रकरणावरून अक्षय शिंदेच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे.अक्षयची आई म्हणाली माझा मुलगा असे करूच शकत नाही. साधा रास्ता क्रॉस करताना तो माझा हात धरायचासमोरून येणाऱ्या वाहनांना तो घाबरायचा, त्याने कधी साधे फटाके फोडले नाही तर तो गोळीबार कसे करू शकतो? असा प्रश्न केला आहे. कालच दुपारी आमची भेट तळोजा कारागृहात झाली. आणि संध्याकाळी त्याच्या मृत्यूची बातमी आली.
त्याच्या कुटुंबीयांनी दावा केला की, त्याला बलात्काराच्या प्रकरणात गुन्हा काबुल करण्यासाठी पोलिसांनी दबाब केला होता. त्याला मारहाण केली. मुलाच्या हत्येची चौकशी केलीच पाहिजे. आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. शाळा प्रशासनाच्या दबावातून हे सर्व प्रकरण झाले आहे. तो असं काहीच करू शकत नाही. या गोळीबाराची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनी केली आहे.
अक्षय शिंदे याला तळोजा तुरुंगातून आणत असताना मोरे यांची बंदूक त्याने खेचली आणि गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला या गोळीबारात मोरे यांना गोळी लागली असून ते जखमी झाले. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला आणि त्याला गोळी लागली. त्यात तो गंभीर जखमी झाला आणि रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.