पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी अक्षय शिंदे याला तळोजा कारागृहातून बदलापूरला तपासासाठी आणले जात होते. मुंब्रा पुलाजवळ त्याने एका अधिकाऱ्याचे शस्त्र हिसकावले आणि पोलिसांवर गोळीबार केला. या गोळीबारात संजय शिंदे आणि सहायक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे जखमी झाले.