मुबंईत सकाळी लोकल पकडण्यासाठी नोकरदार वर्गाची तसेच विद्यार्थ्यांची गर्दी असते. आज सकाळी देखील चर्चगेटच्या दिशेने जात सलेल्या लोकल ट्रेनला प्रचंड गर्दी होती. 22 वर्षाचा हा तरुण लोकलच्या दारावर उभारला असता गोरेगाव ते मालाड स्थानका दरम्यान त्याला प्रवाशांचा धक्का लागला आणि तो धावत्या ट्रेनच्या खाली पडला .त्याला पडलेलं पाहून प्रवाशांनी आरडाओरडा करत लोकल थांबविली आणि तरुणाला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा मृत्यू झाला होता. बोरिवली रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील तपास करत आहे.