आयकर विभागाचा सर्वात मोठा छापा ! मुंबई-ठाण्यासह देशभरात छापे

मंगळवार, 22 मार्च 2022 (13:03 IST)
आज मंगळवारी (22 मार्च) रोजी आयकर विभागाने देशभरात छापे टाकले आहेत . मुंबई, ठाण्यासह देशाच्या अनेक भागात सकाळपासून छापे टाकण्यास सुरुवात झाली आहे. अनेक बडे बिल्डर रडारवर आहेत. मुंबई आणि ठाण्यातील बड्या बांधकाम व्यावसायिकांपैकी एक असलेल्या हिरानंदानी ग्रुपच्या 24 जागेवर छापे टाकण्यात आले आहेत. त्यात मुंबई चेन्नई, बंगळुरू येथील कार्यालयांचा समावेश आहे . याशिवाय , महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या मुंबईतील कुर्ला येथील घरावर अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) छापे टाकले आहेत . मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक सध्या 4 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे. ते मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहे. दाऊद इब्राहिम आणि मुंबई बॉम्बस्फोटाशी संबंधित लोकांकडून कवडीमोल भावाने जमीन खरेदी केल्याचा आरोप त्यांच्या वर आहे.
 
आज सकाळी 8 ते 9 च्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक कुर्ल्यातील गोवाल कंपाऊंड मध्ये पोहोचले. येथे ईडीच्या अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीकडून कागदपत्रे मिळवली आणि त्याची चौकशी सुरू केली. ईडीच्या या टीममध्ये एका महिला अधिकाऱ्याचाही समावेश आहे. यासोबतच सीआरपीएफची मोठी टीमही आहे. याच गोवा कंपाऊंडजवळील जमीन व्यवहार प्रकरणी ईडीने 23 फेब्रुवारीला नवाब मलिक यांना अटक केली होती. या जमिनीशी संबंधित व्यवहारांची अधिक माहिती मिळविण्यासाठी ईडीच्या पथकाने हा छापा टाकला आहे. ईडीच्या हाती कोणते नवे पुरावे हाती येतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र आजच्या छाप्यानंतर नवाब मलिकच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती