BMC ची नारायण राणेंना पुन्हा नोटीस, आता थेट बंगल्यावर महापालिकेचा हातोडा पडणार?

शनिवार, 19 मार्च 2022 (18:13 IST)
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना  मुंबई महापालिकेने (BMC)दुसऱ्यांदा नोटीस पाठवली आहे.  त्यामुळे राणेंच्या आधिश (Adhish) बंगल्यावर खरंच हातोडा पडणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. कारण 15 दिवसांत स्वत: अनधिकृत बांधकाम काढा, अन्यथा कारवाई करावी लागेल, अशी नोटीस बजावण्यात आली होती. अशीच नोटीस पुन्हा एकदा बजावण्यात आली आहे. विशेष म्हणजे दुसऱ्यांदा 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्या विरोधातील अडचणी वाढल्या आहे. राणेंच्या विरोधात ही कारवाई केली जाईल का की ते या प्रकरणी कोर्टात जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 
नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू इथं Adhish नावाचा बंगला आहे. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई पालिकेनं दोन वेळा राणेंच्या बंगल्याची पाहणी केली होती. त्यानंतर नारायण राणे यांच्या घराला मुंबई महापालिकेनं नोटीस बजावली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती