Maharashtra Marathi Breaking News Live Today : भारतीय रिझर्व्ह बँकेचा ९० वा स्थापना दिन मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा केला जाईल. यानिमित्ताने, राष्ट्रपती मुर्मू सोमवारी एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर पोहचल्या. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....
गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादरमधील शिवाजी पार्क येथे एका विशाल सभेला संबोधित केले. यावेळी राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठी भाषा आणि तिच्या आदराबद्दल भाष्य केले. मराठी भाषेबाबत ते म्हणाले की, प्रत्येक राज्याची एक अधिकृत भाषा असते आणि महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी आहे. त्याचा आदर केला पाहिजे. अन्यथा, आवाज तुमच्या कानाखाली केला जाईल.