महाराष्ट्रातील पालघरमधील नालासोपारा येथील 10 वर्षांची मुलगी मुंबईतील रुग्णालयात जीवनाशी लढा देत असून एका आठवड्यापूर्वी तिला येथे दाखल करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार महिला शिकवणी शिक्षिकेने मुलीच्या कानावर मारल्यामुळे केल्याने तिला त्रास झाला. पोलिसांनी ही माहिती दिली असून ही घटना 7 ऑक्टोबर रोजी घडल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एका आठवड्यानंतर मुलीची प्रकृती खालावली आणि ती बेशुद्ध झाली. तसेच तिला रुग्णालयात आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले आहे.
"खाजगी शिकवणी शिक्षिकेने मुलीच्या कानावर खूप मारले, ज्यामुळे सुरुवातीला बहिरेपणा आला, परंतु लवकरच आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. अल्पवयीन मुलीला प्रथम स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर मुंबईतील वैद्यकीय केंद्रात हलविण्यात आले आहे."
मुलगी अजून बेशुद्ध असून तिच्या पालकांच्या तक्रारीवरून शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी शिक्षकाला नोटीस बजावली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.