Russia-Ukraine war: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दोन तासांहून अधिक काळ फोनवरून संवाद साधल्यानंतर सांगितले की रशिया आणि युक्रेन तात्काळ युद्धबंदी चर्चा सुरू करतील. त्यांनी पुतिन यांच्याशी झालेल्या फोनवरील संभाषणाचे वर्णन उत्कृष्ट केले. युद्धबंदीच्या दिशेने प्रगती होण्याची आशा बाळगून ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि युरोपीय नेत्यांशीही चर्चा केली. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, ट्रम्प नाटो नेत्यांशी फोनद्वारे देखील बोलतील.
तसेच "दोन्ही बाजूंनी झालेल्या संभाषणांची सविस्तर माहिती असल्याने अटींवर वाटाघाटी केल्या जातील," असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. आदल्या दिवशी, व्हाईट हाऊसने म्हटले होते की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युद्धाच्या स्थितीमुळे "निराश" आहेत आणि युक्रेन-रशिया युद्धबंदीच्या दिशेने प्रगती करण्याच्या आशेने पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी स्वतंत्रपणे बोलण्याची योजना आखत आहे. या कॉलनंतर पुतिन म्हणाले की, युक्रेनमधील लढाई संपवण्यासाठी मॉस्को काम करण्यास तयार आहे. त्यांनी सांगितले की रशिया शांततापूर्ण तोडग्याच्या बाजूने आहे आणि दोन्ही बाजूंना अनुकूल अशी तडजोड आवश्यक असेल. ट्रम्प यांच्याशी झालेल्या संभाषणाचे वर्णन पुतिन यांनी स्पष्ट आणि अर्थपूर्ण असे केले. त्यांनी सांगितले की, मॉस्को युक्रेनसोबत संभाव्य शांतता कराराची रूपरेषा देणाऱ्या मेमोरँडमवर काम करण्यास तयार आहे.