कृती -
सर्व प्रथम एका मोठ्या भांड्यात पीठ घ्या.
नंतर त्यात गव्हाचे पीठ, साखर, मीठ, वेलची पूड आणि बेकिंग पावडर घालून मिक्स करा. यानंतर त्यात केळी मॅश करून त्यात दूध घालावे.आता या मिश्रणात मैदा आणि गव्हाचे पीठ चांगले मिसळा. चांगल्या प्रकारे ढवळत राहा.
नंतर या पिठात 2 चमचे तूप घालून मिक्स करा. पीठ तयार झाल्यानंतर, 20 मिनिटे असेच राहू द्या.यानंतर गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवा, तवा गरम झाल्यावर त्यावर थोडं तूप पसरवा. नंतर जाडसर पीठ घालताना पीठ पसरवा आणि पॅनकेकभोवती थोडे तूप लावा. पॅनकेक गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मध्यम आचेवर बेक करा, नंतर दुसऱ्या बाजूनेही बेक करा. उरलेले केक्स त्याच प्रकारे बेक करावे.पॅनकेक तयार आहे. हनी बटर,जॅम किंवा तुमच्या आवडत्या फळांनी सजवा आणि खा.