गळून पडलेली फुले

बुधवार, 16 जुलै 2025 (15:42 IST)
मी रोज सकाळी फिरायला जातो तेव्हा एक वृद्ध गृहस्थ झाडाखाली पडलेली फुले उचलून टोपलीत ठेवताना दिसतात.
 
एका सकाळी मी त्यांना विचारले,
"मी तुम्हाला नेहमी जमिनीवरून ही ताजी पडलेली फुले उचलताना पाहतो. तुम्ही त्यांचे काय करता?"
 
"मी ही फुले माझ्या पूजेच्या खोलीत देवतांच्या चरणी अर्पण करतो." 
त्यांनी अतिशय शांतपणे उत्तर दिले.
 
मी पुढे विचारले,
"झाडावर सहज तोडता येणारी फुले असताना खाली पडलेली फुले देवाला कां अर्पण करता?"
 
ते म्हणाले, 
"मी फुलांना त्यांचा उद्देश्य पूर्ण करण्यास मदत करतो - त्यांच्या शेवटच्या दिवसात देवासोबत राहण्याचा! 
त्यांनाही जीवन आहे; आमच्याप्रमाणे त्यांनाही त्यांच्या शेवटच्या दिवसात देवासोबत राहायचे आहे, नाही का?" 
मी सहमती दर्शविली.
 
ते पुढे म्हणाले, 
"गळून पडणे हा फुलांचा दोष नाही. म्हातारपणात मी कुणालाही साथ देऊ शकत नाही, पण किमान या फुलांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी मदत करू शकतो."
 
मी फक्त होकार दिला, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि चालू लागलो. 
 
दुसऱ्या दिवशी सकाळी फिरण्यासाठी गेलो असता एका झाडाखाली पडलेली फुलं उचलली, घरी आणली, धुऊन परमेश्वराच्या चरणी ठेवली!
 
मनापासुन वाटले की मी कोणाचा तरी जीव वाचवला आहे. एखाद्याला त्याच्या दुःखातून बाहेर येण्यास मदत केली आहे.
 
-सोशल मीडिया

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती