कैरीचे लोणचे बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा, रेसिपी देखील जाणून घ्या

शुक्रवार, 31 मार्च 2023 (10:42 IST)
कैरीचे लोणचे वर्षभर टिकावे म्हणून लोणचे घालताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घ्या काही विशेष टिपा-
 
जर तुमच्या घरी कैरी कटिंग कटर नसेल तर तुम्ही बाजारातूनही कैर्‍या कापून आणू शकता.
जर तुम्हाला बाजारातून कैरीचे तुकडे करुन आणले असतील तर घरी आल्यावर त्यांना स्वच्छ पाण्याने धुवा आणि कपड्याने पुसून चार-पाच तास कापडावर पसरून चांगले वाळून घ्या.
कापलेल्या कॅरी धुण्यासाठी पाण्यात भिजवू नका, कॅरी पाण्याने धुवा आणि लगेच सुकविण्यासाठी पसरवा.
कच्च्या कैरीचे लोणचे बनवण्यासाठी मोहरीचे तेल उत्तम आहे. तीळ किंवा शेंगदाणा तेल देखील वापरता येते.
लोणचे बनवल्यानंतर ते मलमल किंवा सुती कापडाने झाकून ठेवल्यास अतिरिक्त ओलावा निघून जातो आणि लोणचे जास्त काळ खराब होत नाही.
कैरीचे लोणचे फक्त कोरड्या बरणीत भरा आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या. यामुळे लोणचे जास्त काळ खराब होणार नाही.
 
कच्च्या कैरीचे लोणचे बनवण्यासाठी साहित्य – 
कैरी 1 किलो
मीठ 90 ग्रॅम
हळद 2 चमचे
लाल तिखट 2 चमचे
हिंग 1/4 चमचे
मेथी दाणे 4 चमचे
पिवळी मोहरी 4 चमचे
बडीशेप 4 चमचे
कलोंजी अर्धा चमचा
दीड कप तेल
 
कैरीचे लोणचे कसे बनवायचे - 
 
ऐका कैरीचे 8-10 तुकडे करा.
मेथी आणि बडीशेप बारीक वाटून घ्या.
एका भांड्यात तेल चांगले गरम करून गॅस बंद करा. भांड्याचा आकार असा असावा की कैरी आणि मसाले सहज मिसळता येतील.
तेलात प्रथम बारीक वाटून मेथीदाणा टाका, नंतर त्यात हिंग, मोहरी आणि भरड बडीशेप घाला आणि परता.
आता हळद आणि लाल तिखट घाला.
हळद आणि तिखट घालताना तेल गरम नसावे, नाहीतर लोणच्याचा रंग खराब होऊ शकतो.
पूर्णपणे थंड होऊ द्या.
ते थंड झाल्यावर लोणचे रुंद तोंडाच्या काचेच्या बरणीत भरून ठेवा.
बारणीच्या तोंडावर मलमलचे कापड बांधून तीन ते चार दिवस उन्हात ठेवावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती