कोथिंबीर बारीक चिरलेली
कृती-
लसूण कढी बनवण्यासाठी सर्वात आधी लसूण मिक्सरच्या भांड्यात टाकून यासोबत त्यात आले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालावी. नंतर या सर्व गोष्टी एकत्र करून चांगले बारीक वाटून घ्यावे.आता एका भांड्यात दही आणि बेसन घालून पेस्ट बनवावी. नंतर त्यात लसूण-आले आणि मिरचीची पेस्ट घालून मिक्स करावे. यानंतर एका पातेल्यात बेसनाचे मिश्रण टाकून उकळू घ्यावे.नंतर त्यात मेथीचे दाणे घालावे. आणि सुमारे 10 मिनिटे ढवळत राहा. यानंतर एका पातेल्यात तूप टाकून गरम करावे. नंतर त्यात लवंगा, तमालपत्र, हिंग, जिरे, लाल मिरची, कढीपत्ता आणि लसूण घालून परतून घ्या.यानंतर मीठ आणि साखर घालून मिक्स करा. आता बेसन-लसूण मिश्रण मध्ये घालून 4 मिनिटे चांगले उकळून गॅस बंद करा. तर चला तयार आहे आपली लसूण कढी जी तुम्ही भात किंवा खिचडी सोबत नक्कीच सर्व्ह करू शकतात.