नारळ पनीरचे चविष्ट लाडू

मंगळवार, 18 मे 2021 (22:14 IST)
साहित्य -
300 ग्राम पनीर,2 चमचे नारळाचं किस,1 वाटी साखर,1/2 चमचा वेलची पूड, 1/2 चमचा मिल्क पावडर,2 चमचे चिरलेले सुखे मेवे,1/2 चमचा साजूक तूप.
 
कृती -
सर्वप्रथम पनीरचे बारीक तुकडे करा.एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात पनीरचे तुकडे मध्यम आचेवर परतून घ्या.मिक्सरमध्ये साखर आणि वेलची पूड,मिल्क पावडर घाला आता साखर आणि वेलचीपूड पनीर मध्ये मिसळा आणि परतून घ्या. गॅस बंद करा.   
मिश्रण थंड होऊ द्या. नंतर या मध्ये  सुकेमेवे आणि नारळाचं  किस मिसळून मिश्रण तयार करा.आता हाताला साजूक तूप लावून गोल गोल लाडवाचा आकार द्या. चविष्ट पनीर नारळाचे लाडू खाण्यासाठी तयार. 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती