चेहरा

शनिवार, 26 जून 2021 (16:06 IST)
त्या माणसाला चेहराच नव्हता!
अचानक पण एक आश्चर्य घडलं
बिनचेहऱ्याचा तो माणुस मैफिलित
गाणं ऐकु लागला
तेंव्हा त्याला चेहरा आला
 
त्याचे डोळे,त्याचे ओठ
गाण्याला दाद देउ लागले,
गाण्याला दाद देता देता
त्याचा चेहरा उजळला!
 
आता फक्त एकच प्रश्न आहे
उजळलेल्या चेहऱ्याचा तो माणुस
घरी जाईल तेंव्हा
त्याच्या घरची माणसं
त्याला ओळखणार नाहीत 
 
कारण त्याचा चेहरा
त्यांनी कधी पाहिलाच नव्हता..
 
– मंगेश पाडगांवकर…
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती