रविवारी सुट्टी का साजरी केली जाते?जाणून घेऊ या

शनिवार, 26 जून 2021 (09:10 IST)
रविवार हा एक मनोरंजनाचा दिवस मानला जातो कारण या दिवशी सुट्टी असते, परंतु असे नाही की रविवार हा जगातील सर्व देशांमध्ये सुट्टीचा दिवस म्हणून  साजरा केला जातो,काही देशांमध्ये रविवार हा सुट्टीचा दिवस म्हणून साजरा केला जातो.आपण कधी हा विचार केला आहे का की रविवारचा का सुट्टी म्हणून साजरा केला जातो?चला तर मग जाणून घेऊ या.
 
अधिकृतपणे रविवार 10 जून 1890 रोजी सुट्टीचा दिवस म्हणून स्वीकारला गेला. त्याकाळी ब्रिटिश राजवटीत कामगारांना आठवड्यातील सातही दिवस काम करावे लागत असे.त्यामुळे कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांसाठी एक दिवस तरी विश्रांती घेण्यासाठीची मागणी इंग्रेजांकडे केली.जी त्यांनी नाकारली त्यासाठी लोखंडे यांनी तब्ब्ल सात वर्ष लढाई केली आणि अखेर या लढानंतर ब्रिटिश सरकारने कामगारांना आठवड्यातून एक दिवस सुट्टी देण्यासाठी मंजुरी  दिली आणि तसेच कामगारांना दुपारी अर्धंदिवस जेवण्यासाठीची सुट्टी देण्यात आली.कारण रविवार हा आठवड्यातील शेवटचा दिवस आहे म्हणून दर रविवारी सुट्टी देण्यात आली.हेच कारण आहे की रविवार हा सुट्टीचा दिवस म्हणून साजरा केला जातो.
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती