आपण कधी विमान बघितले असणार आपण हे लक्षात घेतले आहे का की विमानाचा रंग पांढराच का असतो?जर नाही तर जाणून घेउ या.
खरं तर विमानाला पांढरा रंग करण्यामागील कारण असे आहे की पांढरा रंग ऊर्जेचा कुचालक आहे आणि आपल्यावर येणाऱ्या सूर्याच्या किरणांना परावर्तित करतो.या मुळे विमानाची बाहेरची बाजू जास्त तापत नाही.आणि विमानाचा रंग पांढरा असल्यामुळे काहीही अपघात किंवा नुकसान झाल्यावर लगेच दिसून येत.
विमानाचे अपघात झाल्यावर पांढरा रंग असल्यामुळे विमान सहज शोधता येईल.
हेच कारण आहे की जास्त करून विमानाचा रंग पांढरा असतो.