सिम कार्डचा एक कोपरा का कापलेला असतो जाणून घ्या

मंगळवार, 22 जून 2021 (08:40 IST)
आजकाल सर्वजण एकमेकांशी बोलण्यासाठी मोबाईलचा वापर करतात,मोबाईल शिवाय आता जगणे अपूर्ण वाटत आहे.मोबाईल मधील सिमकार्डचे महत्त्व आहे.या सिमकार्ड शिवाय मोबाईल काहीच कामाचा नाही.सिमकार्ड नसेल तर मोबाईल फक्त गाणं ऐकण्याचे साधनच राहील.परंतु आपण कधी सिमकार्डकडे बघितले आहे का की सिम कार्डाचा एक कोपरा कापलेला का असतो.चला जाणून घेऊ या.
 
खरं तर ज्यावेळी मोबाईलचा  शोध लावला गेला तेव्हा त्यामधून सिम काढायची सोय नव्हती,आपण घेतलेला मोबाईलचा तोच नंबर वापरावा लागायचा.नंतर या मध्ये सुधारणा करण्यात आली आणि सिमकार्डचा शोध लागला,जे आपण कोणत्याही मोबाईल मध्ये वापरू शकत होतो.परंतु ते सिम कार्ड सर्व बाजूने एक सारखे होते.लोकांना हे समजायला मार्ग नव्हता की हे सिमकार्ड मोबाईल मध्ये कोणत्या बाजूने टाकावे.बऱ्याच वेळा सिमकार्ड चुकीचे लावल्याने मोबाईलमध्ये बऱ्याच समस्या उद्भवू लागल्या.या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सिम बनविणाऱ्या कंपनीने सिमचा एक कोपरा कापून दिला.जेणे करून लोकांना हे समजेल की मोबाईल मध्ये सिम कोणत्या बाजूने लावायची आहे.सिम कार्डाचा कोपरा लोकांच्या सुविधेसाठी कापला गेला आहे.हेच कारण आहे की सिम कार्डाचा एक कोपरा कापलेला असतो.   
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती