कुटुंबावर प्रेम करणारी आणि काळजी घेणारी
अनेकदा मुलींना केवळ मुलाशी संबंध ठेवायला आवडतो पण याउलट मुलाच्या कुटुंबावर प्रेम करणारी, त्यांची विचारपूस करणारी आणि काळजी घेणारी मुलगी सर्वांची पसंत असते. अशा मुलींप्रती मुलांचा दृष्टीकोन आदराचा असतो. अशा मुलींना ते जन्मभर जपून ठेवतात आणि जीवापाड प्रेम करतात.
कौतुक करणारी
प्रशंसा ऐकणे केवळ मुलींना नव्हे तर मुलांनाही पसंत असतं. त्यांच्या केलेल्या कामांचे भरभरुन कौतुक केलं तो निश्चित आपल्यावर प्रसन्न राहील. त्याने कामात हातभार लावल्यावर किंवा एखादी सरप्राइज पार्टी दिल्यावर किंवा एखादी भेटवस्तू आणून दिल्यास त्याचे कौतुक करावे मग बघा जीवनात असे किती तरी आनंदाचे क्षण आपली वाट बघत असतील.