फॅमिली प्लानिंग करताय? मग नक्की वाचा

गुरूवार, 14 जानेवारी 2021 (13:29 IST)
लग्न करुन सुखी संसार करत असलेल्या जोडप्यांकडून समाजाला एकच अपेक्षा असते की पाळणा कधी हालणार? तिसर्‍याचं स्वागत करायचं म्हणजे कुटुंबात आनंद तर पसरतोच पण धुक-धुक देखील लागते कसे होणार. कारण बाळा आल्यावर जोडप्यांच जगच बदलून जातं. याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम समोर येतात. म्हणून प्लानिंग करण्यापूर्वी नीट विचार करा.
 
आई-बाबा बनणं हा आनंदाचा क्षण असतो पण सोबतच जबाबदारी ही वाढते. रोमांससाठी वेळ मिळत नाही तर साथीदाराची चिडचिड देखील होऊ शकते. कारण संपूर्ण वेळ हा आता बाळाचा असतो. अशात ‍फिरायला जाणे, हॉटेलिंग करणे हे सर्व अवघड होऊ लागतो.
 
मुलं झाल्यावर केवळ सांभाळण्याची नव्हे तर आर्थिक जबाबदारी देखील वाढते. बाळाच्या छोट्या मोठ्या गरजा पूर्ण करणे त्यातून बायको काही काळ त्याचा सांभाळ करत असताना आर्थिक गणित गडबडणे साहजिक आहे. अशात कर्तव्यात वाढ होते. 
 
बाळ झाल्यानंतर नवरा-बायकोमधील संवाद कमी होत जातो. महिला आणि बाळाचे शारीरिक व मानसिक आरोग्यात बदल होत असताना ते सोडवण्यात वेळ निघून जातो. निवांत बसून गप्पा करणे स्वप्नासारखं वाटू लागतं.
 
तसेच मनोरंजनासाठी मित्रांसोबत हॅगआउट करणे, लेट नाइट पार्टिज हे सर्व शक्य होत नाही. घरातून बाहेर पडण्याआधी दहादा विचार करावा लागतो. अशात बाहेर जाणे नकोसं वाटू लागतं.
 
जबाबदारी व कर्तव्य दोन्हींमध्ये वाढ झाल्यामुळे चि‍डचिड आणि पती-पत्नी यांच्यात वादाचे प्रसंग वाढू लागतात. संगोपन, घराची आणि ऑफिसची काम करताना चांगलीच दमछाक होते. 
 
एकूण काय तर हे सर्व लक्षात घेऊन परिस्थितीचे आकलन करुन मनाची तयारी असल्यावरच प्लानिंग करणे योग्य ठरेल. संपूर्ण प्लानिंग करुन नव्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी केली तर जीवन आनंदाने भरु जाईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती