मुलांमध्ये असणाऱ्या या 5 चुकीच्या सवयी मानसिक आरोग्यास हानी पोहोचवू शकतात, सावधगिरी बाळगा..
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020 (13:07 IST)
कोरोनामुळे मोठ्यांमध्येच नव्हे तर लहान मुलांच्या जीवनामध्ये देखील ताण वाढला आहे. लहान असो किंवा मोठे दोघांच्या ही मानसिक आरोग्यात होणारी घसरण याचा दुष्प्रभाव लवकरच शारीरिक आरोग्यावर देखील होऊ लागतो. ताण तणावाच्या या वातावरणात मुले काही वाईट सवयींना बळी पडत आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 5 वाईट सवयी.
1 व्यायामाचा अभाव - कोरोनामुळे मुलांचे घरातून बाहेर पडण्याचे प्रमाण फार कमी झाले आहे. आरोग्यावर झालेल्या अनेक अभ्यासानुसार शारीरिक हालचालींच्या अभावामुळे मानसिक आरोग्यावर देखील वाईट परिणाम पडतो. आणि माणूस नैराश्याला बळी पडतो. व्यायाम आणि मानसिक आरोग्यामध्ये थेट संबंध आहे. आपण व्यायाम करत नसल्यास मानसिक ताण जाणवू शकतो.
2 जास्त ताण - आजकालच्या वातावरणामुळे मुलांमध्ये देखील तणावाचा परिणाम वाढत आहे. अनियंत्रित ताण मुलांच्या मेंदूस हानी पोहोचवतो. ताण पडल्यास मेंदू कॉर्टिसॉल हार्मोन सोडतो जे मेंदूच्या व्यवस्थितरीत्या कार्य करण्यास अडथळा आणतो.
3 राग - अभ्यासानुसार, अनियंत्रित राग देखील मुलांना मानसिकरीत्या परिणामी असतो, ह्याचा थेट वाईट परिणाम त्यांचा विचारसरणी वर होतो.
4 पुरेश्या झोपेचा अभाव - चांगली झोप घेतल्यावर एखादा व्यक्ती संपूर्ण दिवस तणाव मुक्त आणि सक्रियता अनुभवतो. झोप आपल्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवते. मुलांना रात्रीची पुरेशी झोप मिळत नसल्यास त्याला मानसिकदृष्ट्या अस्वस्थता जाणवू लागते. मुलांचे मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी किमान 7 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे.
5 नकारात्मक विचारसरणी - मुलांमध्ये त्यांची नकारात्मक विचारसरणी त्यांचा मानसिक विकासाच्या मार्गाचा सर्वात मोठा अडथळा आहे. आपल्या या खराब अश्या वाईट सवयी मुळे त्यांचा जीवनाबद्दल चा दृष्टिकोन नकारात्मक होऊ लागतो, जेणे करून मुलं आपल्या जीवनाशी निगडित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात चुका