अभिनेत्री राणी चटर्जीने फेसबुकवर एका माणसासंबधित स्क्रीनशॉट शेअर केला आहे आणि त्याबरोबर तिने लिहिले आहे की, हा माणून तिला गेल्या अनेक काळापासून त्रास देत आहे. हा इसम तिला शिव्या देत असल्याचंंही तिने यावेळी नमूद केले आहे.
त्याचप्रमाणे अभद्र भाषा वापरत असल्याची तक्रार राणीने केली आहे. राणीने असे म्हटले आहे की, 'जेव्हा काही लोकं तिला या माणसाने लिहिलेल्या पोस्टचा स्क्रीनशॉट पाठवतात तेव्हा मला खूप दु:ख होते आणि त्यावेळी नैराश्य येते.' या इसमामुळे दीर्घकाळापासून आपण नैराश्याचा सामना करत असल्याचे राणीने म्हटले आहे.
2020 हे वर्ष मनोरंजन विश्वासाठी धक्कादायक ठरले आहे. आत्महत्या आणि मृत्यूंमुळे पुरते मनोरंजन विश्व हादरले आहे. इरफान खान, ऋषी कपूर यांचा अकाली मृत्यू त्याचप्रमाणे सुशांत सिंह राजपूत, त्याची मॅनेजर आणि टिकटॉक स्टार सिया कक्कर यांच्या आत्महत्या- या साऱ्यामुळे इंडस्ट्रीने अनेक कलाकार गमावले आहेत. त्यामुळे राणी चटर्जीची ही पोस्ट खळबळ माजवणारी आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांची काय प्रतिक्रिया येईल, पाहणे महत्वाचे ठरेल.