उपवास रेसिपी : बटाट्याची खीर

गुरूवार, 19 डिसेंबर 2024 (07:37 IST)
बटाटा आपण नेहमी भाजी, कटलेट किंवा इतर पदार्थ बनवण्यासाठी वापरतो. बटाटा हा भाज्यांमध्ये महत्वाचा मानला जातो. तसेच उपवासाच्या पदार्थांमध्ये देखील बटाटा वापरण्यात येतो. म्हणूनच आज आपण बटाटयाचा आणखीन एक पदार्थ पाहणार आहोत. तो म्हणजे बटाट्याची खीर. तर चला कशी बनवावी बटाट्याची खीर जाणून घ्या. 
 
साहित्य-
1 लीटर दूध
4 मध्यम आकाराचे बटाटे(उकडलेले)
साखर 
केशर 
मिक्स ड्राय फ्रूट्स कापलेले 
दोन थेंब केवडा वॉटर 
 
कृती- 
बटाटयाची खीर बनवण्यासाठी दूध आटवावे. यानंतर उकडलेल्या बटाटयाचे साल काढून मॅश करून घ्या. आता दुधामध्ये साखर घालावी. यानंतर वेलची, बटाटे आणि ड्राय फ्रूट्स देखील मिक्स करावे. खीर शिजल्यानंतर घट्ट होईल यानंतर गॅस वरून खाली कडून घ्यावी. मग त्यामध्ये केवडा वॉटर मिक्स करावे. तर चला तयार आहे आपली बटाटा खीर.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती