उपवासाला चालणाऱ्या केळीच्या या तीन रेसिपी नक्की ट्राय करा

शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2024 (12:09 IST)
केळीची खीर 
साहित्य- 
पिकलेली केळी 
गाईचे दूध   
तांदूळ 
साखर 
वेलची पूड 
काजू 
बादाम   
 
कृती-
केळीची खीर बनवण्यासाठी सर्वात आधी पिकलेली केळी घ्यावी. आता तांदूळ स्वच्छ धुवून 30 मिनिटांसाठी भिजत ठेवावे. आता दुधाला उकळून त्यामध्ये टाकावे. व काही वेळ परत दूध उकळून घ्यावे. आता मॅश केलेली केळी आणि इतर सर्व साहित्य त्या दुधामध्ये घालावे. तर चला तयार आहे आपली केळीची खीर रेसिपी, उपवासाला नक्कीच ट्राय करा.  
 
केळीचे चिप्स 
साहित्य-
कच्चे केळी 
सेंधव मीठ 
मिरे पूड 
लिंबाचा रस 
तेल 
 
कृती-
केळीचे चिप्स बनवण्यासाठी सर्वात आधी कच्चे केळीचे साल काढून त्यांचे स्लाइस बनवून घ्या. व लिंबाच्या पाण्यात भिजत ठेवा. आता ते वाळवून घ्यावे. मग एका कढईमध्ये तेल घालून ते कुरकुरीत तळून घ्यावे. आता त्यावर सेंधव मीठ घालावे, तसेच मिरे पूड घालावे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही तिखट देखील घालू शकतात. आता हे चिप्स हाताने मिक्स करवून घ्यावे म्हणजे टाकलेले साहित्य चिप्समध्ये मिक्स होईल. तर चला तयार आहे आपले चविष्ट कुरकुरीत केळीचे चिप्स जे तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकतात. 
 
केळीचा हलवा-
साहित्य-
पिकलेली केळी 
रवा
तूप
साखर 
वेलची पूड 
काजू 
किशमिश 
 
कृती-  
केळीचा हलवा बनवण्यासाठी सर्वात आधी एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये रवा घालावा. व रवा भाजून घ्यावा. आता त्यामध्ये मॅश केलेले केळी आणि साखर घालावी व परतवून घ्यावे. आता हे मिश्रण शिजल्यानंतर त्यामध्ये काजू आणि किशमिश घालावे. तर चला तयार आहे आपला केळीचा हलवा उपवासाला नक्कीच ट्राय करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती